पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी विहंग विहार रिसॉर्टचे मालक श्री. जगदीश ठाकुर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालघर येथील भास्करवाडी कृषी पर्यटन केंद्रात ज्येष्ठ उद्योजक श्री.जयवंत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सन २०२४ ते २७ या वर्षाकरिता नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. प्रभाकर सावे, श्री. हरिश्चंद्र चौधरी, श्री. राजेश अधिकारी, कार्यवाह पदी श्री. अजय राऊत, सहकार्यवाह पदी श्री. किरण पाटील आणि खजिनदारपदी श्री. नितीन म्हात्रे यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी चौदा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व नवीन कार्यकारणी आणि श्री. जगदीश ठाकूर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!!