जागतिक अॅथलेटिक्स असोसिएशनद्वारे घेण्यात येणाऱ्या पंच परीक्षेत तारापूर शाखेचे सुपुत्र श्री. राकेश सावे हे ९१. ५ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पंच म्हणून काम पाहू शकणार आहेत. या पंच परीक्षेत ९९ भारतीय स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १८ जण ही परीक्षा उत्तीर्ण झाले. श्री. राकेश सावे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे महाराष्ट्रातील ते एकमेव पंच आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पंच म्हणून श्री. राकेश सावे आपली भूमिका निभावणार आहेत. आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
congratulations
congratulations