सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ यांसी, सप्रेम नमस्कार, विश्रामधाम, केळवे रोड आणि स्मारक मंदिर पुनर्बांधणी प्रकल्प, दादर या दोन्ही प्रकल्पाकरिता समर्पण भावनेने अमूल्य योगदान देणारे प्रख्यात आर्किटेक्ट आणि सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा जीवन गौरव प्राप्त समाजहितैशी श्री. दीपक जगन्नाथ ठाकूर, यांना अल्पश: आजारानंतर काल दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी देवाज्ञा झाली. या दुःखद घटनेमुळे सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची नियोजित १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ ऐवजी रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम, केळवे रोड येथे संघाचे अध्यक्ष मान. श्री. नरेश जनार्दन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे. सभेच्या तारखेत केलेल्या बदलाची नोंद घ्यावी आणि आपण सभेस अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती. कळावे, आपले नम्र, प्रफुल्ल दा. म्हात्रे, सौ. रजनी वि. राऊत, सौ. सुलांजना चं. सावे, विविध र. पाटील चिटणीस, सो. क्ष. स. संघ