सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ, कला आणि सांस्कृतिक समिती वाडवळ आयडॉल २०२४🎤 आपल्या सर्वांच्या लोकाग्रहास्तव वाडवळ आयडॉल स्पर्धेसाठी वयाची अट काढून २० वर्षा वरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली करण्यात आली आहे. ज्ञाती बंधू भगिनीच्या भरपूर प्रतिसादामुळे आपल्या अनेकांच्या सूचनांचा व मतांचा आदर करून लोकाग्रहास्तव हा बदल संघाने व समितीने केला आहे. आपल्या गाण्याचा व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख वाढवून सोमवार, दि. २५ मार्च २०२४.करण्यात आली आहे ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. प्राथमिक फेरीसाठी मराठी किंवा हिंदी कोणत्याही गाण्याची निवड करून संगीत माध्यमाचा वापर करून किंवा संगीत माध्यमाशिवाय दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून दिलेल्या मुदतीत पाठवायचा आहे. अंतिम फेरी दि.७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता भुवनेश कीर्तने विद्यालय माहीम येथे घेण्यात येईल. आपले, अध्यक्ष सो. क्ष. स. संघ व कला व सांस्कृतिक समिती.