ISRO IN SPACE द्वारे आयोजित CAN SAT स्पर्धेत कमिन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फाॅर वुमन, पुणे या महाविद्यालयाच्या प्रोफेसर डाॅ.सौ. दिप्ती दुर्गेश पाटील (आगाशी) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या Can size उपग्रहाचे अहमदाबाद येथे द्रोणद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी या टीमला डॉ.सौ. दिप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली *'सर्वोत्कृष्ट टीम वर्क अवॉर्ड'* मिळाला आणि संपूर्ण भारतभर सहभागी झालेल्या 80 संघांपैकी सर्वोत्कृष्ट 2 संघांना दिल्ली येथे राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने उपग्रहाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. चांद्रयान 3 मोहिमेत विक्रम लॅन्डरने दि.23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीपणे लॅन्डिग केले, या यशस्वी कामगिरीमुळे पंतप्रधान मान. श्री.नरेंद्र मोदी यांनी हा दिवस 2024 या वर्षापासून 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. यावर्षी दिल्ली मध्ये साजरा होणारा हा पहिलाच राष्ट्रीय अंतराळ दिवस . या समारंभात सहभागी होण्याची तसेच राष्ट्रपती मान. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर प्रेझेंटेशन करण्याची संधी डॉ.सौ दिप्ती पाटील यांना मिळाली. या यशाबद्दल डॉ .सौ.दिप्ती पाटील यांचे खूप खूप अभिनंदन आणि यापुढेही असेच यश मिळावे, यासाठी शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐