Home > Economics > सोक्ष संघ खुंतोडी शाखेतील श्री उज्ज्वल म्हात्रे ह्यांची कंपनी 'ओरिएण्ट टेक्नॉलॉजीज' प्रारंभिक भागविक्रीतून २१५ कोटी उभारणार!

सोक्ष संघ खुंतोडी शाखेतील श्री उज्ज्वल म्हात्रे ह्यांची कंपनी 'ओरिएण्ट टेक्नॉलॉजीज' प्रारंभिक भागविक्रीतून २१५ कोटी उभारणार!

loading...
सोक्ष संघ खुंतोडी शाखेतील श्री उज्ज्वल म्हात्रे ह्यांची कंपनी 'ओरिएण्ट टेक्नॉलॉजीज' प्रारंभिक भागविक्रीतून २१५ कोटी उभारणार!

सोक्ष संघ खुंतोडी शाखेतील श्री उज्ज्वल म्हात्रे ह्यांची कंपनी 'ओरिएण्ट टेक्नॉलॉजीज' प्रारंभिक भागविक्रीतून २१५ कोटी उभारणार! आपल्या समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे👍 माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मुंबईस्थित कंपनी ओरिएण्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत, प्रत्येकी १९५ रुपये ते २०६ रुपये किमतीने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली असून, त्यायोगे २१४.७६ कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे. कंपनीचा आयपीओ येत्या बुधवारी. २१ ऑगस्टला गुंतवणुकीसाठी खुला होत असून, २३ ऑगस्टला तो बंद होईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ७२ समभागांसाठी आणि त्यानंतर ७२ समभागांच्या पटीत बोली लावणारा अर्ज सादर करावा लागेल. भागविक्रीपश्चात कंपनीचे समभाग मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात (बीएसई, एनएसई ) २८ ऑगस्ट रोजी सूचिबद्ध होणे अपेक्षित आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक अजय सावंत (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), उमेश शहा, उज्ज्वल म्हात्रे आणि जयेश शहा हे त्याच्याकडील आंशिक समभागांची विक्री (ओएफएस) करणार आहेत. ओरिएण्ट टेककडून माहिती- तंत्रज्ञान पायाभूत सुविधा, माहिती- तंत्रज्ञान सेवा, तसेच क्लाउड आणि विदा व्यवस्थापन अशा तीन व्यवसायांतून महसूल मिळविला जातो. कंपनीच्या एकूण उत्पन्नांत या तीन व्यवसायांचा सध्या अनुक्रमे ५२ टक्के, २२ टक्के आणि २६ टक्के असा वाटा आहे. कंपनीकडे ३० जून २०२४ अखेर एकूण १०१.२० कोटी रुपयांचे कार्यादेश असून, तिच्या ग्राहक नामावलीत कोल इंडिया, माझगांव डॉक, डी' डिकोर, ज्योती लॅब्स, एसीजी, इंटिग्रॉन, ब्लूचिप, ट्रेडबुल्स अशा कंपन्या आहेत. प्रामुख्याने भारतात १,४५० कर्मचाऱ्यांसह कार्यरत कंपनीची, नवी मुंबई, पुणे, अहमदाबाद, नवी दिल्ली, बेंगळूरु आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये विक्री आणि सेवा कार्यालये आहेत. भागविक्रीतून येणाऱ्या निधीचा वापर कंपनीकडून नवी मुंबईत नवीन कार्यालयीन इमारतीसाठी तसेच भांडवली विस्तार योजनेवरील खर्चासाठी केला जाणार आहे. श्री उज्ज्वल म्हात्रे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

loading...
Comments

congratulations 👏🏻 we are very proud of you 👍🏻

Sponsored Ads

...
...
...
...
...
Economics

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems