Home > Current Affairs > पद्मश्री.भाऊसाहेब व श्रीम.इंदूताई वर्तक विश्रामधाम (०९ वा) वर्धापनदिन सोहळा.

पद्मश्री.भाऊसाहेब व श्रीम.इंदूताई वर्तक विश्रामधाम (०९ वा) वर्धापनदिन सोहळा.

loading...
पद्मश्री.भाऊसाहेब व श्रीम.इंदूताई वर्तक विश्रामधाम (०९ वा) वर्धापनदिन सोहळा.

पद्मश्री.भाऊसाहेब व श्रीम.इंदूताई वर्तक विश्रामधाम (०९ वा) वर्धापनदिन सोहळा. प्रमुख पाहुण्या : डॉक्टर मनस्वी पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष : संघ अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत. विश्रामधाम समिती प्रमुख : अशोक राऊत, आरोग्यधाम समिती प्रमुख : श्री जितेंद्र राऊत, डॉ. भार्गव ठाकूर. विश्रामधाम व्यवस्थापिका : सौ सुजाता सोहनी. आणि विश्रामधाम रहिवासी वृंद. प्रशस्त व हवेशीर खोल्या, सुसज्ज असे फर्निचर, मध्ये लॉन व त्यामध्ये शोभेची व सुगंधित फुलझाडे लावलेली आहेत आणि बसण्यासाठी दोन झोपाळे देखील आहेत. पॅसेजमध्ये ठिकठिकाणी बसण्यासाठी बँचेस ठेवले आहेत. तेथे बसले की निरभ्र आकाशाचे दर्शन व आजुबाजुच्या हिरवळीने मन प्रसन्न होते. वाचनासाठी सुसज्ज वाचनालय व त्यामध्ये उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. मनोरंजनासाठी एल.ई.डी. दूरदर्शन संच, खेळण्यासाठी पत्ते, कॅरम, बुध्दीबळ, हौजी इत्यादी तसेच सुमधुर संगीत ऐकण्यासाठी ठिकठिकाणी स्पिकर लावलेले आहे. विविध वृत्तपत्रे वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. स्वयंपाकघर आधुनिक पध्दतीचे व हायजेनिक आहे. जेवणाच्या खोलीमध्ये पूर्ण स्वच्छता पाळली जाते. एका खोलीत दोघे व दुसऱ्या खोलीत पाच जण राहतील अशा वेगवेगळ्या पध्दतीच्या स्वतंत्र व संयुक्त खोल्या आहेत. या आनंदी व प्रसन्न वातावरणात एकमेकांचे वाढदिवस, सगळे सण खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले जातात. विश्रामधामचा बाहेरचा परिसर आंबा, पेरु, चिकू, जाम, केळी इत्यादी फळांनी बहरलेला आहे. त्यामुळे अशा विविध फळांचा आस्वाद निवासींना घेता येतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केळवेरोड स्टेशनपासून ५ मिनिटांच्या अंतरावर विश्रामधाम आहे. काही मोजक्याच जागा शिलूक आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री. अशोक का राऊत - समिती प्रमुख विश्रामधाम सौ. सुजाता श. सोहोनी- व्यवस्थापिका विश्रामधाम संपर्क -९६७३९०४८३३

Comments

Sponsored Ads

...
...
...
...
...
Current Affairs

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems