Home > Achievements > कृत्तिका नंदन वर्तक (राष्ट्रीय जलतरणपटू ) ही पहिली आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जलतरण प्रशिक्षक.

कृत्तिका नंदन वर्तक (राष्ट्रीय जलतरणपटू ) ही पहिली आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जलतरण प्रशिक्षक.

loading...
कृत्तिका नंदन वर्तक (राष्ट्रीय जलतरणपटू ) ही पहिली आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जलतरण प्रशिक्षक.

🔴 🏊🏻‍♀️🏊🏻‍♀️🏊🏻‍♀️ तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की _कृत्तिका नंदन वर्तक_ (राष्ट्रीय जलतरणपटू) आता एक व्यावसायिक आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक आहे.....🏊🏻♀️ तिला आता आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटी आणि कॅनडा सरकार मार्फत तिचे सर्व अधिकृत प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे प्रमाणित आहेत:- 1) पोहण्याचे प्रशिक्षक 2) राष्ट्रीय जीवरक्षक - पूल 3) CPR-C सह मानक प्रथमोपचार 4) कांस्य पदक 5) कांस्य क्रॉस 🏊🏻‍♀️🏊🏻‍♀️🏊🏻‍♀️ कृत्तिका सध्या कॅनडा मध्ये टोरांटो येथील यॉर्क युनिव्हर्सिटी मधून सायकॉलॉजीचा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम शिकत आहे...2 वर्ष झाली...या दरम्यान कॅनडा सरकार कडून ती इथली नॅशनल प्लेअर म्हणून तिला हा कोर्स करायची संधी मिळाली. जो या क्षेत्रात निपुण असतो त्यांना ह्या कोर्स मध्ये वर्षाला 20 जणांना फक्त प्रवेश मिळतो... खूप खडतर कोर्स...दोन महिन्यांचा कोर्स....त्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवार या दिवशी 12 तास अभ्यास आणि प्रशिक्षण घ्यावे लागते ....6 तास पाण्यात आणि 6 तास लेक्चर....असा सगळा प्रवास....हा कोर्स जे पास होतात त्यांना कॅनडातील सरकारी स्पोर्ट्स क्लब (कम्युनिटी सेंटर) मध्ये प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येते. तिला कॅनडा सरकार कडून हा जॉब ऑफर झाला आहे...जॉब साठी तिथली तिची पोलीस NOC चे सोपस्कार ही पूर्ण झाले.. कृत्तिका 20 वर्षाची असून सायकॉलॉजी पदवी शिकत असल्याने ती शनिवार रविवार तिथल्या सरकारी क्लब (कम्युनिटी सेंटर) मध्ये प्रशिक्षक म्हणून रुजू होईल. आपल्या समाजाची म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची कृत्तिका नंदन वर्तक (राष्ट्रीय जलतरणपटू ) ही पहिली आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जलतरण प्रशिक्षक.... कृत्तिकाचे यश हे अतिशय कौतुकास्पद. फारच थोडी मुले ह्या एव्हाड्याश्या लहान वयांत इतकी उंची गाठू शकतात. आपल्या मुलीने कॅनडा सारख्या देशांत एव्हढी झेप घेतली आहे. अभिनंदन कृत्तिकाचे व तिच्या आई बाबांचे. All the best in her all endeavours.

Comments

खूप खूप अभिनंदन

Sponsored Ads

...
...
...
...
...
Achievements

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems