Home > Current Affairs > सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ ३१ वा महिला मेळाव्याला उत्तम प्रतिसाद.

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ ३१ वा महिला मेळाव्याला उत्तम प्रतिसाद.

loading...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ ३१ वा महिला मेळाव्याला उत्तम प्रतिसाद.

लेखन - सौ. वंदना कमळाकर चुरी सप्रेम नमस्कार 😊🙏 आपल्या समाजाचा 31 वा महिला मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी रोजी, श्री. दिपक वासुदेव राऊत नगरी, श्री एकविरा आई मंदिराजवळ, माकुणसार पूर्व.. येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ह्यावर्षी समाजाच्या भगिनींनी विक्रमी हजेरी लावली. जवळपास तीन हजार वाडवळ भगिनी इथे उपस्थित होत्या. आयोजकांचे नियोजन अतिशय सुव्यवस्थित होते. परंतु मोठ्या संख्येमुळे त्यांचीही थोडी धावपळ झाली असावी. वर्षानुगणिक महिलांचा सहभाग वाढतोय, अगदी शाळकरी मुलींची पण उपस्थिती जाणवत होती. हे समाजाच्या उत्कर्षाचंच प्रतिक आहे असं मानूया 😊.. पण एक समाज एव्हढ्या मोठ्या संख्येने एका छताखाली जेव्हा एकत्र येतो, त्यातही स्त्रीशक्ती.... तेव्हा त्यातून काही विधायक कार्य घडण्याला चालना मिळते.. आपल्या समाजाची जनगणना तसेच आपल्या दादर येथील वास्तुच्या कार्यात निधीसंकलन ह्या दोन महत्वाच्या बाबींसाठी,आपले लाडके अध्यक्ष श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत यांनी सर्व भगिनींना अगदी मनापासुन कळकळीचे आवाहन केले आहे. आणि आपल्या भगिनी समाजाच्या ह्या विधायक कार्याला मोठ्या संख्येने सहकार्य करणार ह्यात शंकाच नाही 👍... कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा.डॉ. श्री. किरण जयदेव सावे यांनी भगिनींना अगदी गोड शब्दात कौटुंबिक स्वास्थ्याची व्याख्या उकलून सांगितली.. घरातील एक स्त्री संपूर्ण घराचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळत असते. ती पूर्ण कुटुंबाची समन्वयक असते. घडवणं हे तिच्या हातात असतं.. म्हणूनच ती House wife नाही तर House maker असते.. हे अगदी मनाला पटलं आणि भावलं पण 🙏😊. दुसऱ्या विशेष अतिथी, मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या मा. सौ. छाया वारंगे... यांनी त्यांच्या क्षेत्राशी निगडित म्हणजे धान्य, मसाले इ. खरेदी करताना कसे परीक्षण करावे. असली नकली कसे ओळखावे हे अगदी ओघवत्या शैलीत समजावून दिले. आणखी बरंच काही त्यांच्याकडून ऐकायला मिळावं, आमच्या ज्ञानात थोडी अधिक भर पडावी अशी अपेक्षा होती पण त्यांना वेळ कमी मिळाला.. त्यामुळे राहून गेलं असं वाटलं. त्यातल्या त्यात छायाताईनी वाडवळणींची थोडी परीक्षा पण घेतली हं.. 😄 त्यानंतरच्या मधल्या वेळेत आपल्याच वाडवळ भगिनींचा, एक परिसंवाद झाला.. विषय अर्थातच, सध्याची कौटुंबिक समस्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण.... खरंतर हा विषय संपूर्ण समाजासाठी चिंतेचा आहे. आणि इथे भाग घेतलेल्या भगिनी अतिशय अभ्यासपूर्ण बोलत होत्या. घटस्फोटाचे मुख्य कारण शोधताना अनेक कारणं सांगितली गेली.. पण त्यातही एक दोन कारणावर जास्त बोलले गेले. पण एक गोष्ट निदर्शनास आली कि सभामंडपात हा विषय अनेकांच्या अनुभवाने चर्चिला जात होता. चांगली गोष्ट आहे कि समाजाच्या व्यासपीठावर निर्भीडपणे आपल्या महिला या विषयावर बोलतात. कौतुक आहे सर्वांचं.शेवटी सौ. लतिका ताईनी मजेदार प्रश्नावली घेऊन कार्यक्रमाचा ताण हलका केला.. 🙏😊 नंतर एक भगिनी स्टेजवर आल्या.. आणि त्यांनी काय प्रस्ताव मांडला माहित आहे!! त्या म्हणाल्या,आज आपण सगळ्या इथे आलोत आणि आपले नवरे वा घरचे सर्व पुरुष घरी आहेत म्हणून आपण येऊ शकलो. तर ह्यापुढे सो क्ष स संघाने, आपल्या समाजाच्या संपूर्ण पुरुष वर्गासाठी असा एक मेळावा, वर्षातून एकदा आयोजित करावा.. 👏👏 धन्य ती माऊली 🙏🙏🙏😊 ( बघा.. बंधुनो.. विचार करा. 👍) नंतर ह्यावर भगिनींकडून बऱ्याच कॉमेंट्स येत होत्या, मुख्य तर.. पुरुष दिवसभर काय कार्यक्रम सादर करतील? ( बघा हं.. बायकानी चॅलेंज दिलंय 😄) असो. दुसऱ्या सत्रात,सगळ्या भगिनी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात तो सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झाला.. ह्यावेळी आम्हाला सकाळी पोहोचायला थोडा उशीर झाला त्यामुळे अगदी शेवटी बसणं नशिबात आलं 😄.. पण तिथेही काही निरीक्षण करायला मिळालं... शाळेत जशी मागच्या बाकावर खोडकर मुलं बसतात.. तशीच काहीशी स्थिती इथेही असते. वक्ता स्टेजवर बोलत असतो, पुढचे तल्लीन होऊन ऐकत असतात, आणि पाठीमागे सेल्फी प्रोग्राम सुरु असतो, घरच्या दारच्या गप्पा.. साड्या दागिने आणिक काय काय...समोर चाललेल्या प्रबोधनाशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं.. त्यात ज्यांना वक्त्यांना खरोखरच ऐकायचं असतं त्यांची अवस्था बिकट असते.. हे लिहायला वाचायला कटू आहे पण सत्य आहे. असो. सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झाले... गावोगावच्या महिलांनी अतिशय सुंदर अविष्कार सादर केले. इथे कोणत्याही एका शाखेचं नाव घेऊन नाही चालणार.. कारण अगदी सर्व...सर्वच शाखानी, तिथल्या मुलींनी खूप मेहनत केलेली दिसत होती. सर्व भगिनींची अशी अवस्था झाली होती कि, ह्या दोन डोळ्यात हे सुंदर क्षण किती साठवू अन किती नको 😘 काही प्रबोधनपर नाटिकाही होत्या. मनाला खूपच भावल्या त्या.. त्यात चिंचणी शाखेच्या नाटिकेचा उल्लेख टाळता येणार नाही. विधवा स्त्रीला झेलाव्या लागणाऱ्या उपेक्षा, अवहेलना.. खूप परिणामकारक.. सुंदर अभिनय.. अक्षरशः काही भगिनी डोळ्यांतले अश्रू नाही लपवू शकल्या.. 🙏 अशीच समाज प्रबोधन करणारी अजून एक नाटिका शाखा चटाळे येथील ( रेखा वर्तक असे त्यांनी नाव सांगितले ) जुन्या वाडवळी म्हणी वापरुन.. सासू सुनामधील खुसखुशीत संवाद.. प्री वेडींग पासून मुलांच्या संख्येपर्यंत... सासूबाईच्या वाडवळी बोलीने धम्माल आणली.. 👍 अनेक शाखांची लोकनृत्य खूप सुंदर होती. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या कथेवर आधारित पुरुलिया छाव हा ऐतिहासिक कथानृत्य म्हणता येईल असा आवेशपूर्ण कलाविष्कार शाखा वाणगावच्या भगिनींनी सादर केला. ह्याचा खास उल्लेख अशासाठी केलाय कि, काहीतरी वेगळं बघायला मिळालं.. कार्यक्रमात तोचतोपणा आला कि बघणाऱ्यांचा उत्साह कमी होतो. म्हणून यापुढे काही नवीन बघायला मिळेल अशी आशा करु या. तीन हजार महिलांचे भोजन चहा नाश्ता हे सर्व आयोजकांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. आयोजकांकडून जेव्हा भगिनींना एखादी विनंती केली जाते तेव्हा खरंच भगिनींनी त्यांच्या शब्दाचा आदर करावा...🙏🙏 अजून काही काळाने बहुतेक महिला मेळावा हा एखाद्या स्टेडियम मध्येच आयोजित करावा लागेल कि काय असा विचार नकळत मनात आला. आपले अध्यक्ष मा. भाईसाहेब ह्या गोष्टीचाही विचार करुन ठेवतील 😊🙏 इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणं सोपं काम नाही. पण माकुणसार शाखेने हे शिवधनुष्य पेललं आणि उत्तमरित्या कार्य सिद्धिस नेले. ह्यामागे अनेक बंधू भगिनी, ग्रामस्थ,सो क्ष स संघांचे अध्यक्ष मा.श्री. नरेशभाई राऊत,सर्व पदाधिकारी, महिला समिती सदस्या, कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष तसेच कार्यकर्त्या, स्थानिक पोलीस, ग्रामपंचायत अशा अनंत लोकांचे सहकार्य आहे. देहेरी पासुन पुणे मुंबई पर्यंतच्या भगिनी ह्या मेळाव्याला आल्या आणि आनंद घेऊन आपापल्या घरी परतल्या.. आणिक काय हवे!! 😊 सौ. वंदना कमळाकर चुरी 8424926106

Comments

Sponsored Ads

...
...
...
...
...
Current Affairs

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems