जिनीत ने धातूंमधील गंज शोधण्याच्या त्याच्या उत्कृष्ट पद्धतीसाठी आयआयटी मुंबई कडून पेटंट मिळविले आहे. हे आपल्या समाजासाठी भूषणा व अभिमानास्पद आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. जीनितत मुळातच संशोधक वृत्तीचा असल्याने त्याने शालेय शिक्षणापासून आज पर्यंत अनेक यशस्वी प्रयोग, प्रात्यक्षिके, केलेली आहेत. त्याच्या या मेहनती,संशोधक, अभ्यासू व जिज्ञासू वृत्तीचे फलित म्हणजे त्याला मिळालेले हे पेटंट होय. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये त्याने घवघवीत यश संपादन केलेले आहे. जिनीत चे बाबा श्री. प्रदीप पाटील हे बी.एस.टी मधून सेवानिवृत्त झालेले असून सध्या ते विरार येथे 'शुभम कॅटर्स' हा यशस्वी व्यवसाय करतात. तर आई सौ. छाया पाटील ह्या शिक्षिका असून या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठिंबा जिनीतला लाभला आहे. जिनीतच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिनित मनःपूर्वक कौतुक आणि हार्दिक अभिनंदन!💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा॥