सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ, कला व सांस्कृतिक समिती आणि माहीम शाखा आयोजित वाडवळ आयडोल स्पर्धेची अंतिम फेरी स्पर्धा रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी भुवनेश कीर्तने विद्यालय, माहीम, तालुका - पालघर येथे पार पडली. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री. नरेशभाई राऊत, अध्यक्ष, सो.क्ष. स. संघ यांनी तर उद्घाटक म्हणून श्री. अजय ठाकूर, माजी अध्यक्ष, सो. क्ष. स. संघ यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती समन्वयक सौ. सुलंतना सावे यांनी केले. या अंतिम फेरीत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाला संघाचे इतर पदाधिकारी तसेच सुमारे २५० संगीत प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती लावली तर आठ हजाराहून अधिकांनी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहीम शाखा व कला सांस्कृतिक समितीने विशेष परीश्रम घेतते, सूत्रसंचलन रुपाली पाटील व प्रणाली म्हात्रे यांनी केले. सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे *प्रथम - जुईता पाटील राऊत शाखा बोर्डी (वाडवळ आयडॉल २०२४)* द्वितीय - रुपाली यतीन चौधरी . शाखा - उमेळे तृतीय - सरिता विलास चौधरी. शाखा - माहीम उत्तेजनार्थ - १) पल्लवी संदीप वर्तक शाखा - मांडलई २) श्वेता हर्षित वर्तक. शाखा - उमेळे ३) धीरज गोपीनाथ राऊत. शाखा - उसरणी बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रशांत चुरी यांनी केले, समितीचे प्रमुख विनय पाटील व माहीम शाखा अध्यक्ष जयंत वर्तक ह्यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या समस्त टिमने कार्यक्रम यशस्वी केला. सरते शेवटी पसायनदान हंसा पाटील यांनी सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाच्या आयोजना मुळे सो क्ष संघाच्या कला सांस्कृतिक समितीचे सर्व समाजात कौतुक होतं आहे .