सो.क्ष.संघाचे विद्यमान अध्यक्ष, दानशूर उद्योजक, सामाजिक दायित्व जपणारे आवडते व्यक्तीमत्व लायन श्री.नरेशभाई जनार्दन राऊत यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन झाई बोरीगाव व बोर्डी घोलवड शाखेतील समाज बंधू भगिनींनी शुभेच्छा दिल्या. तसेच झाई बोरीगाव शाखेतील १)श्री.विकास महादेव म्हात्रे रुपये १०००००/-एकूण देणगी २५००००/-रु. २) श्री.जगदिश विश्वनाथ राऊत रुपये ७४०००/-एकूण देणगी १२५०००/-रु. ३) श्री.संतोष जगन्नाथ चुरी.७४०००/-एकूण देणगी १२५०००/-रु. ४) श्री.किशोर जयराम पाटील ५१०००/-रुपये. या प्रमाणे झाई बोरीगाव शाखेकडून २९९०००/-चे धनादेश मान.अध्यक्षांच्या हाती देण्यात आले. तसेच बोर्डी घोलवड शाखेतील १) संघाचे माजी उपाध्यक्ष चिटणीस श्री.राजन जगन्नाथ चुरी रुपये ५००००/-एकूण देणगी १०००००/-रु. २)श्रीम.रेखा रविंद्र राऊत रुपये १००००/-. याप्रमाणे ६००००/-रुपयांचे धनादेश एकूण ३५९०००/-अक्षरी रुपये तीन लाख एकोणसाठ हजार रुपये देणगी देण्यात आली. सदर प्रसंगी भाईंचे बंधू बोर्डी घोलवड शाखेचे माजी अध्यक्ष श्री.किरण जनार्दन राऊत, श्री.प्रदिप नारायण चुरी, श्री.रमेश परशराम चुरी,सो.क्ष.संघाचे विद्यमान विश्वस्त व डहाणू विभाग निधी संकलन समिती प्रमुख श्री.अनिल भास्कर सावे, तसेच नरेश भाईंच्या सौभाग्यवती मीनाताई, बोर्डी घोलवड शाखेचे नवनियुक्त चिटणीस श्री.परिक्षीत हरिहर राऊत,झाई बोरीगाव शाखेचे पुन्हा संधी मिळालेल्या अध्यक्ष सौ.संगीता संतोष चुरी व चिटणीस सौ.पुनम सुहास सावे उपस्थित होते.🌹🌹👍👏