वसईतील आरोग्यदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कविता चौधरी यांना यंदाचा स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक महिलादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कविता चौधरी यांच्या आरोग्य सेवा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेवून नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. त्या बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरांवर कौतुक होत असून विविध वर्तमानपत्रांनी ही बातमी आज प्रसिद्ध केली आहे. सो. क्ष. समाजातर्फे त्यांचे कौतुक व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉 आम्हाला आपला अभिमान आहे.