सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा ४६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ९ डिसेंबर २०२३ रोजी आगाशी येथे अगदीं थाटात पार पडला,युवक मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेश राऊत व प्रमुख अतिथी मा.श्री.योगेशजी भामरे आणि सौ. बिना पाटील तसेच अध्यक्षस्थान भूषविणारे मा.सुरेश राऊत म्हणजे नाना यांनी द्वीप प्रजलपित करून शुभारंभ केला. सर्व अथितीचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, मंडळाचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी आपल्या भाषणात आता पर्यंत झालेल्या कार्यक्रमाचा तपशील साविस्तर सांगितला,अतिथी चे आभार मानले, मान्यवरांची भाषणे झाली. उपाध्यक्ष केतन म्हात्रे यांचे युवक मंडळाला खूप मोठे योगदान आहे, स्टेज पासुन ते अतिथी च्या स्वागताच्या तयारी पर्यंत अगदीं चोख करतं होते, कमी बोलणे पण काम एकदम नेक, असा युवा नेता आपल्या मंडळात आहे ही अभिमानाची बाब आहे. सौ.राजश्री म्हात्रे, श्री.तुषार पाटील आणि त्याचे सहकारी यांनी या समारंभाला खूपच मेहनत घेतली, प्रतीक म्हात्रे यांनी सुंदर फोटोग्राफी केली. मान्यवरांच्या हस्ते अंकुर ह्या हस्त लिखिताचे प्रकाशन करण्यात आले.सौ.सुजाता कवळी अगदीं नियोजन बद्ध सुत्र संचालन करत होत्या त्यांना साथ मिळाली ती सौ.हर्षला राऊत आणि तिच्या कार्यकारणी सदस्य महीला वर्गाची, आपले पारितोषिक विजेते पद कधि मिळणार याची किलबिल अगदी आतुरतेने वाट पाहत होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षिसे देण्यात आली.. कला, क्रिडा, शैक्षणिक, नोकरी, व्यवसाय व इतर मिळालेल्या यशाबद्दल श्रीफळ शाल व मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. करमणुकीचे कार्यक्रम खूप छान झाले,मंडळाच्या वतीने सौ.सुजाता कवळी यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.