खुमासदार नात्यांचा गोडा मसाला सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत सोक्ष समाजाची केळवेरोडची महिमा कृष्णकांत म्हात्रे प्रमुख भूमिकेत सोनी मराठी वाहिनीवर ३ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या 'खुमासदर नात्यांचा गोडा मसाला' (सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वाजता) या मालिकेची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातून आलेली कुमारी महिमा कृष्णकांत म्हात्रे ही या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. महिमा पालघर जिल्ह्यातल्या केळवेरोड येथील राहणारी. तिचे प्राथमिक शिक्षण केळवेरोडच्याच प्राथमिक विद्यालयात झाले. - त्यानंतर तिचे कुटुंब पालघर येथे वास्तव्यास आले. तेथे 'भगिनी समाज विद्या मंदिर या शाळेत महिमाने माध्यमिक शिक्षण घेतले. शाळेपासूनच आपल्या कामात हुशार असलेल्या महिला अभिनयाची विशेष आवड होती. शालेय शिक्षणानंतर पालघर येथील दांडेकर महाविद्यालयात B.A.इ. च्या दुसऱ्या वर्षाला असताना तिने 'मिस अल्ल्युर' या सौदर्य स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतील सहभागाने तिला खूप काही शिकायला मिळाले. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे झाली आणि त्यात तिला मिस फोटोजेनिक अवार्ड मिळाला. या यशानंतर आणखी दोन सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला व त्या मधील एका सौंदर्य स्पर्धेत 'सेकंड रनर अप' ही पदवी मिळाली. या स्पर्धांमध्ये अभिनय करणे व स्टेजवर कॅमेऱ्यासमोर वावरण्याच्या अनुभवाने तिला मोठा आत्मविश्वास मिळाला. अभिनयाची आवड असली तरी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे तिने काही ठरविले नव्हते. त्यामुळे अभिनायाचे पद्धतशीर शिक्षण वैगेरे तिने काही घेतले नव्हते. परंतु अचानक एक दिवस तिला आपला अभिनय सादर करण्याची संधी चालून आली. पालघर येथे L.I.C. बँचच्या उद्घाटन समारंभावेळी 'लाईफ इन्सुरन्सची आवश्यकता' या विषयावर एक नाट्यछटा सादर केली. अत्यंत उत्कृष्टपणे तिने ते सादर केले. तिचा उत्कृष्ट अभिनय आणि प्रभावी वत्कृत्वाने उपस्थितांवर चांगलीच छाप पाडली. त्यावेळी सर्वांनी केलेले कौतुक आणि घरच्यांची शाबासकी यामुळे महिमाला आपल्यातल्या गुणवत्तेची जाणीव झाली. अभिनय क्षेत्र तिला साद घालू लागले. त्या क्षेत्रकडे ती गांभीर्याने पाहू लागली. अभिनय क्षेत्रात काम करण्याचे नक्की केले तरी ही वाट सहज सोपी नव्हती. मार्गदर्शन करील असं आसपास कोणीही नव्हतं. इंटरनेटवरून माहिती घेत घेत तिची वाटचाल सुरु झाली. या क्षेत्रात प्रवेश करायचा तर जिथे जिथे ऑडिशन असतील तिथे त्या देत राहयचं हा एक मार्ग तिला सापडला. त्याप्रमाणे ती प्रयत्न करू लागली. ओपन ऑडिशन असतील तर तासंतास रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पहावी लागे. तरी निराश न होता आपला नंबर आला की पूर्ण क्षमतेने ती आपलं सादरीकरण करायची. परंतु यश असं लगेच मिळत नाही त्यसाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी तिला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक ऑडिशनला तिची आई सतत तिच्या बरोबर असायची. बराच संघर्ष केल्यावर तिला स्टार प्रवाह, कलर्स मराठी झी मराठी अशा वाहिनीवर छोट्या मोठ्या भूमिका मिळाल्या. भूमिका कितीही छोटी असो. ती समरसून आणि पूर्ण क्षमतेने करायची अशी तिची काम करण्याची पद्धत होती. सतत नवनवीन शिकण्याची इच्छा आणि त्यासाठी कसून परिश्रम करण्याची तयारी यामुळे तिला हळूहळू यश मिळत गेले. गेल्या वर्षी झी मराठी वाहिनीच्या 'दार उघड बये' या मालिकेत ती 'जया' या भूमिकेत होती. त्यात तिने आपली भूमिका चांगल्या प्रकारे साकारली. नुकत्याच सोनी मराठी' वाहिनीवर सुरु झालेल्या 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' या मालिकेत तिला 'सानिका' नावाने मुख्य भूमिका मिळाली. त्यामुळे तिच्या घरच्यांना. नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला खूप आनंद झाला. या संधीचं ती नक्कीच सोनं करील असा विश्वास सर्व व्यक्त करतात. तिचे वडील (श्री. के. के. म्हात्रे) हे पेशाने नामांकित विमासल्लागार असून आई सुद्धा त्या शेत्रात कार्यरत आहे. आपल्या वाटचालीबद्दल बोलताना महिमा आईवडीलांचा आणि बहिणभावाचा व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आवर्जून उल्लेख करते. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे याची तिला जाणीव आहे. पुढे देखील आपल्या घरच्यांचा नातेवाईकांचा आणि मित्रपरिवाराचा पाठींबा आपल्याला मिळेल याची तिला खात्री आहे. दरम्यानच्या काळात तिने B.A.F. आणि Accounts and Finance मधून MBA च शिक्षण देखिल पूर्ण केल आहे. ग्रामीण भागातून येऊन इत्यक्या कमी वेळात अभिनय क्षेत्रात महिमाने मिळवलेले यश इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे.