भारतीय जलतरण महासंघातर्फे दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या “खेलो इंडिया अस्मिता महिला जलतरण लीग – २०२६” या स्पर्धेसाठी श्री. नंदन वर्तक यांची तांत्रिक अधिकारी (Technical Official) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मानाच्या नियुक्तीबद्दल श्री. नंदन वर्तक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.👏👍