महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. या निकालात पालघर जिल्ह्यात वसई अव्वल आले असून वसईचा 94.46 टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.विरार पश्चिम आगाशी येथील डाॕ.एन पी शहा शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून ध्रुव राऊत हा विद्यार्थी 97.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. आगाशी ,उंबरगोठन येथील ध्रुव पराग राऊत हा शाळेत पहिला आला आहे.ध्रव याला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घ्यायचे आहे.शिकवणी व्यतीरीक्त रोज 14 तास अभ्यास करुन त्याने हे यश संपादन केले.आपल्या यशाचे श्रेय त्याने आई - बाबा व गुरु जणांना दिले आहे.