Home > Achievements > *प्रसाद विजय हेमा राऊत (उंबरगोठण): यशाची प्रेरणादायी कहाणी .*

*प्रसाद विजय हेमा राऊत (उंबरगोठण): यशाची प्रेरणादायी कहाणी .*

loading...
*प्रसाद विजय हेमा राऊत (उंबरगोठण): यशाची प्रेरणादायी कहाणी .*

उंबरगोठण गावातील, राऊत आळी येथे राहणारा *AGM.प्रसाद विजय हेमा राऊत* हा मेहनती, जिद्द आणि चिकाटीचा उत्तम नमुना आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्याने आपल्या कष्टाच्या बळावर मोठे यश मिळवले आहे.अवघ्या १४ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, तरीही आई आणि बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कष्टाच्या कठीण प्रवासातून त्याने जिद्दीने वाटचाल केली. प्रसादच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा आधार तसेच आशीर्वाद हेच त्याचे खरे बळ ठरले आणि अखेर त्या संघर्षातून एक तेजस्वी हिरा चमकला. प्रसादने आपले शालेय शिक्षण पूर्ण करून दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणाबद्दलची आवड आणि प्रगतीची इच्छा यामुळे त्याने *M. L. Dahanukar College ,Vile parle* येथे शिक्षण घेतले. आणि पुढे एमबीए (MBA)प्रथम श्रेणी, पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला प्लेसमेंटच्या माध्यमातून *Bank of India, या सरकारी प्रतिष्ठित बँकेत नोकरीची संधी मिळाली.* नोकरी करत असताना प्रसादने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने आपली जबाबदारी पार पाडली. त्याच्या कष्टांने, प्रामाणिकपणा आणि कामातील निष्ठेमुळे त्याने कमी वयात बँकेत सतत प्रगती केली. आज तो *Assistant General Manager (सहायक महाव्यवस्थापक)* या महत्त्वाच्या पदावर पोहोचला आहे. प्रसाद राऊत यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. गावातील साध्या वातावरणातून सुरुवात करून मोठ्या पदापर्यंत पोहोचणे हे त्यांच्या मेहनतीचे आणि दृढ निश्चयाचे फलित आहे. त्यांच्या यशामुळे त्यांच्या समाजालाही अभिमान वाटतो.

Comments

अभिनंदन!

Achievements

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems