महामंडळच्या (वसई) हीरक महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . लहानथोरा पासून सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते . एक रॅली देवाळे गावातून निघुन खालघर - वासळई - राऊतवाडी- पारनाका मार्गे समाज मंदिर ला पोहोचली तर दुसरी रॅली उमेळा - किरवली मुळगाव मार्गे समाज मंदिर ला पोहोचली. समाज मंदिर ला पोहोचल्यावर सगळ्यांचे पाय बँजो च्या तालावर थिरकले. नंतर दीप प्रज्वलन करून आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि या वर्षात नवनवीन कार्यक्रम करण्याचे ठरविले.