स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, बुधवारी देशभरातील ६२४ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलातील शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ५९ पोलिसांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १७ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलिस शौर्य पदके, ३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल, ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल पदके जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात आले. पोलिस दलातील गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल पदक विजेत्यांमध्ये उपअधीक्षक विनीत चौधरी, यांचा समावेश आहे. उपअधीक्षक विनीत चौधरी यांना गौरवण्यात येणार आहे. उपअधीक्षक विनीत चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐