बुधवार दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या पर्यवेक्षिका व शिक्षिका सौ. कांचन कृष्णदत्त पाटील यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या दि.३१ जुलै २०२४ रोजी विद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत. माजी विद्यार्थी सांस्कृतिक भवन, माहीम येथे माहीम शिक्षण संस्था, भुवनेश कीर्तने विद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय यशवंत ठाकूर अध्यक्ष माहीम शिक्षण संस्था तसेच प्रमुख पाहुणे धनेश भास्कर वर्तक माजी मुख्याध्यापक सौ यमुना य. निजाप हायस्कूल, शिरगाव हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शाळेचे सह शिक्षक रामदास कुंभारे, नंदिनी सरदार शाळेच्यावतीने मनोगते सादर केली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, संस्थेचे विश्वस्त जयवंत सावे, बी.एम. राऊत, कार्यकारी विश्वस्त नरेंद्र पाटील तसेच माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा निलम राऊत, माजी शिक्षक विनय पाटील, अरविंद वर्तक, माजी मुख्या सुधीर गवादे, माजी विद्यार्थी प्रफुल्ल म्हात्रे, सत्कार मूर्तीचे कुटुंबीय कादंबरी चुरी, कोमल राऊत या सर्व मान्यवरांनी मनोगते सादर केली. प्रमुख पाहुणे धनेश भास्कर वर्तक माजी मुख्याध्यापक यांनी सत्कारमूर्ती कांचन पाटील यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देताना म्हटले की आजच्या युगातील शाळेतील शिक्षण पद्धती व त्या शिक्षण पद्धतीवर चालणाऱ्या खाजगी शाळा गुणात्मक शिक्षणाकडे कसे दुर्लक्ष करतात यावर त्यांनी आपले भाष्य व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर यांनी कांचनबाई यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनातील आपल्या सहभागाच्या काही घडामोडी उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक संतोष शेलार तसेच पाहुण्यांची ओळख संस्थेचे मानद सचिव संजय पाटील यांनी केले. सत्कारमूर्ती यांचा माहीम शिक्षण संस्था, शाळा, तसेच माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून सत्कार करण्यात आला. प्रमाणपत्राचे वाचन अश्विनी पाटील यांनी केले. साडी ओटी उल्का वाघ व प्राजक्ता पाटील यांनी केली. आपल्या सुमधुर वाणीने रूपाली चौधरी व ज्योती जाधव या शिक्षकांनी सूत्रसंचालननाची जबाबदारी पार पाडली. आभाराचे काम संस्थेचे खजिनदार अमित पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच माहीम शिक्षण संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य व माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच सत्कारमूर्ती कांचनबाईंचे पती कृष्णादत्त पाटील, मुलगी व इतर कुटुंबीय, स्नेही, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनांनी करण्यात आली. 💐 सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. ..तुम्हास निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏