मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या TALENT HUNT For fast Bowlers च्या विविध ठिकाणी निवड चाचण्या घेण्यात आल्या, या मध्ये वानखेडे स्टेडियम, मुंबई, एअर इंडिया मैदान,कलीना, क्लब अॅक्वेरिया राज्य बोरिवली, साईनाथ स्पोर्ट्स विरार, चिखलीकर मैदान,वाणगाव, युनियन क्रिकेट अकादमी, कल्याण, नेरूळ जिमखाना , नेरूळ येथील मैदानावर जलदगती गोलंदाज शोधण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व भागांतून आलेल्या गोलंदाजांमधुन आपल्या माहीम - गिलगोडी क्रिकेट संघातील कु.तनिष सुभाष सावे याची निवड झाली. ह्या निवड चाचणी साठी माजी क्रिकेटपटू, गोलंदाज,१९८३ च्या विश्वचषक विजेता संघातील खेळाडू बलविंदर सिंग संधू हे होते. ह्या वर्षी काॅलेजचे मैदान बनविण्यात आले आहे .आणखी ते चांगले बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे तनिष सारख्या खेळाडुला खूप फायदा होणार आहे. ह्या वर्षी पासून चालू केलेल्या काॅलेज मधील प्रशिक्षण शिबीरा मध्ये आणि काॅलेजच्या संघामध्ये तनिष नियमितपणे सरावासाठी जात असे तसेच पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर प्रॅक्टीस मॅच साठी येत असे. अशा प्रकारे तनिषने खूप मेहनत घेतली आहे. खेळातील सातत्य आणि मेहनत घेतल्यास तो नक्कीच यशस्वी होईल. तनिषचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐💐