Soft-Tech Computers, Palghar ला MKCL कडून पाच पुरस्कार मिळाले हे सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो. संगणक शिक्षणातील एमएस-सीआयटी शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी चार संस्थात्मक आणि एक वैयक्तिक असे पाच पुरस्कार सॉफ्ट-टेक कॉम्प्युटर्स संस्थेला मिळाले. 1. MS-CIT हाय पॉइंट फीचर शेअर टू लर्नर्स अवॉर्ड. 2. लर्नर्स द्वारे MS-CIT थिअरी ॲपचा सर्वाधिक वापर अवॉर्ड 3. शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या MOM- महाराष्ट्र ऑलिम्पियाड मूव्हमेंट ऍडमिशन परफॉर्मन्स अवॉर्ड. 4.MS-CIT सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी पुरस्कार. ५. सौ.निलम निनाद सावे यांना पालघर जिल्ह्यासाठी MS-CIT मास्टर ट्रेनर म्हणून निवड. MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही डिजिटल साक्षरता आणि IT सक्षम रोजगाराभिमुख व्यावसायिक शिक्षणासाठी काम करणारी राज्य सरकारची संस्था आहे. महान शिक्षणतज्ञ कै.डॉ.राम ताकवले आणि पद्मविभूषण डॉ. विजय भटकर ह्यांचे ही संस्था स्थापन करण्यात मोलाचे योगदान आहे. संगणक तज्ञ श्री.विवेक सावंत यांनी संचालन करून तिला नावारूपाला आणली.सध्या पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सॉफ्ट-टेक कॉम्प्युटर्स 2001 पासून या जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रदात्याचा भागीदार आहे. सॉफ्ट-टेक कॉम्प्युटर माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्ससाठी प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील नावाजलेली संस्था. सॉफ्ट-टेक कॉम्प्युटर्सची 1989 पासून संगणक आणि करिअर शिक्षणामध्ये व्यावसायिकरित्या व्यवस्थापित शिक्षण संस्था म्हणून स्वतःची ओळख आहे. सॉफ्ट टेक कॉम्प्युटर ही पालघरमधील पहिली संगणक संस्था आहे आणि तिने ३४ वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केली आहेत. निनाद जयवंत सावे आणि निलम निनाद सावे (रेवाळे- माहीम) यांचे अभिनंदन. त्यांच्या यशामुळे समाजात त्यांचे कौतुक होत आहे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा