समाज मंदिर ट्रस्ट, वसई आयोजित पुरूष व महिलांसाठी मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा या सोक्षम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नरवीर चिमाजी अप्पा मैदान, वसई येथे शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी झाले. स्पर्धेचे हे ३७ वे वर्ष होते. महिलांसाठी आयोजित अंडरआर्म स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रीडापटू श्री.चित्तरंजन (बापू) म्हात्रे ह्याच्या शुभहस्ते झाले. सदर स्पर्धेत आगाशी (अ) संघ विजयी तर मांडलई (ब) संघ उपविजेता ठरला. वृंदाली वर्तक ह्यांना मालिकावीर, खुशी राऊत ह्यांना उत्कृष्ट फलंदाज तर दीपा पाटील उत्कृष्ट गोलंदाज ठरल्या. पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी चेअरमन सुरेश चौधरी सर यांच्या हस्ते झाले. पुरुष क्रिकेट सामन्यासाठी वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील 22 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ रवि दि.7 जानेवारी 2024 रोजी संध्या 5.30 वा नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर संपन्न झाला. मथाणे संघाला विजेता चषक चेअरमन नितीन म्हात्रे ह्यांच्या हस्ते व उमेळे संघाला उपविजेता चषक श्री जगदीश राऊत ह्यांच्या हस्ते देण्यात आला. यश चौधरी मालिकावीर, निशांत वर्तक उत्कृष्ट गोलंदाज व परेश पाटील उत्कृष्ट फलंदाज यांना डॉ प्रशिल पाटील,वसई विकास बँक संचालक, विश्वस्त, ज्येष्ठ कार्यकर्ते ह्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चेअरमन नितीन म्हात्रे कार्यकारी विश्वस्त केवल वर्तक क्रिडा प्रतिनिधी संज्योत वर्तक, सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, वसई विकास बँकेचे संचालक यांनी मेहनत घेतली समाज बांधव व वसईतील क्रीडाप्रेमी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. नितीन के म्हात्रे चेअरमन समाज मंदिर ट्रस्ट