मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या TALENT HUNT For fast Bowlers च्या विविध ठिकाणी निवड चाचण्या घेण्यात आल्या, या मध्ये वानखेडे स्टेडियम मुंबई, एअर इंडिया मैदान कलीना, क्लब Aquaria बोरिवली, साईनाथ स्पोर्ट्स विरार, चिखलीकर मैदान,वाणगाव, युनियन क्रिकेट अकादमी, कल्याण, नेरूळ जिमखाना , नेरूळ येथील मैदानावर 19 वर्षाखालील जलदगती गोलंदाज शोधण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व भागांतून आलेल्या गोलंदाजांमधुन आपल्या विरार येथिल ( केळवेरोड ) साईनाथ क्रिकेट क्लब संघातील कु.दैविक अतुल सावे याची निवड झाली.सद्या त्याचे वय अवघे 15 वर्ष असुन तो या गटातील सर्वात लहान मुलगा आहे.ह्या निवड चाचणी चे प्रमुख निवडकर्ते माजी क्रिकेटपटू, गोलंदाज,१९८३ च्या विश्वचषक विजेता संघातील खेळाडू बलविंदर सिंग संधू हे होते. सध्या दैविक चे प्रशिक्षण मुंबई क्रिकेट असोसिएशन शरद पवार अकॅडमि येथे संधू सरांचा टीम मार्गदर्शना खाली सुरु आहे,तसेच दिनेश लाड जे रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचे प्रशिक्षक आहेत त्यांचा मार्गदर्शना खाली देखील त्याचे प्रशिक्षण चालू आहे. त्यामुळे दैविक ला ह्या सर्वांचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. कुमार दैविक अतुल सावे हा आपल्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिथयश शेतकरी श्री चंद्रकांत सावे केळवे रोड याचा नातू आहे !! खेळातील सातत्य आणि मेहनत घेतल्यास तो नक्कीच यशस्वी होईल आणि आणखीन पुढे जाईल 👍 दैविक चे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐💐