 
                            कांदिवली येथील पायोनियर एज्युकेशन ट्रस्ट संचालित ग.दा. जोशी पायोनियर प्राथमिक विद्यालयातील ज्येष्ठ ,विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री मनोज माणिक वर्तक शाखा- एडवण यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री.मनोज वर्तक सर हे गेली 31 वर्ष पायोनियर एज्युकेशन सेवेत आहेत.विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अध्यापन, अनेक उपक्रम व शिष्यवृत्ती व स्पर्धांसाठी मार्गदर्शन करत असतात. कोविड काळात सरांनी बृहन्मुंबई शिक्षण विभागातर्फे "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमासाठी ऑनलाईन अध्यापनही केले होते. बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी साहेब,उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम आणि शिक्षणाधिकारी मा. सुजाता खरे मॅडम यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
