एकवीरा महिला मंडळातील महिलांनी 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून केळवा रोड येथील आनंदवन ऍग्रो टुरिझम रिसोर्ट येथे सहल आयोजित केली होती. वेज आणि नॉन वेज जेवणाचा आस्वाद घेत. वेगवेगळे खेळ खेळून पूर्ण दिवस आनंदात घालवला. एवढेच नाही तर आता तोंडावर आलेल्या रंगपंचमीची मजा देखील त्यांनी लुटली. 35 महिलांनी हजेरी लावून सहलीचा आनंद लुटला. आपले वयं विसरुन एकीमेकीत मिसळून गेल्या आणि अगदी मैत्रीच्या रंगात न्हाऊन निघाल्या. अध्यक्षा विद्या सावे आणि त्यांची सर्व टीम निमा सावे शितल पाटील कृपाली म्हात्रे रंजना सावे मिनल सावे रंजना राऊत अमिता चौधरी प्रतिक्षा सावे अशा सर्वच जणींनी सहकार्य केले. सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. Happy women's day 💐