नमस्कार , रविवार दिनांक 19 जानेवारी 2025, सो.क्ष.स . संघाच्या बोरिवली पश्चिम शाखेमध्ये लहान मुलांच्या वेशभूषा, चित्रकला स्पर्धा ,तसेच मोठ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व संध्याकाळी समाजातील काही युवकांनी सुंदर गायनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यासाठी शाखेचे अध्यक्ष किरण पाटील व चिटणीस सुनिती पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती. तसेच शाखेतील कार्यकर्त्यांनी भाग घेऊन उस्फूर्तपणे मदत केली या सर्वांमुळेच कार्यक्रम यशस्वी झाला आणि खूपच सुंदर झाला. त्या कार्यक्रमातील काही क्षण....