 
                            शुक्रवारी (दि.२६) ला यशवंतराव चव्हाण सेंटर व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, उद्योजक अशोक जैन, खासदार सुप्रिया सुळे, ना. धों. महानोर यांच्या कन्या सरला महानोर-शिंदे , यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या सहा विभागातून गीतकार अविनाश पोईनकर (चंद्रपुर), मुक्त पत्रकार हिना कौसर खान (पुणे), कवी-गीतकार वैभव देशमुख (बुलढाणा), सुचिता खल्लाळ (नांदेड) यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार तर *(माहीम) मधील श्रीमती साधना उमेश वर्तक* आणि नंदुरबारमधील कुसुम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येकी २५ हजार रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. *श्रीमती साधना ताई ची महाराष्ट्राच्या २५ लेडीज उमेदवार मधुन निवड झाली आहे*. निवड करताना काही अटी होत्या. त्यामध्ये लेडीज उमेदवार, वयाची अट, आर्थिक परिस्थिती. आधुनिक शेती, शेती उत्पादनातून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे. ई... साधना ताई, खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
 
                                