तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ आयोजित तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघाचे २५ वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी 'कै. वासुदेव काशिनाथ सावे-पिताश्री' सभागृह, तारापूर येथे संपन्न झाले. या संमेलनाचे आयोजन तारापूर, चिंचणी, वाणगाव या शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष : मान. श्री. रंजन जगन्नाथ पाटील अध्यक्ष तात्यासाहेब चुरी वसतिगृह- माजी विद्यार्थी संघ स्वागताध्यक्ष : मान. डॉ. नरेश हरिश्चंद्र सावे (उपाध्यक्ष, सो.क्ष.स. संघ. प्रमुख अतिथी : मान. डॉ. किरण जयदेव सावे प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर. विशेष अतिथी मान. श्री. राजेश नरेंद्र पाटील उद्योजक. Director, Vitek Group) तसेच मान. श्री. रामचंद्र रघुनाथ सावे कृषीभूषण पुरस्कार सन्मानित. आणि मान. श्री. गोपाळ हरिश्चंद्र चुरी, माजी मुख्याध्यापक ज.म. ठाकूर हायस्कूल-वाणगाव