योगासन स्पर्धेसाठी संघ जयपूरकडे रवाना, सफाळे शाखेचा विधीश राऊत करणार महाराष्ट्राचे नेतृत्व. १४ वर्षा खालील मुली व मुले यांचे सराव शिबीर अहमदनगर येथे संपन्न झाले असून जयपूर येथे होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेसाठी हा संघ जयपूरकडे रवाना झाला आहे. योगासन स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्यातून विधीश राऊत महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे व त्याचे कोच फैयाज जमादार हे महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आहेत. या संघासोबत सोबत अहमदनगर क्रीडा अधिकारी दीपाली बोडके, महिला प्रशिक्षक सानिका जाधव व पुरुष प्रशिक्षक फैयाज जमादार रवाना झाले आहेत. अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा 🎉🎊