 
                            कुमार मीत हर्षल पाटील माहीम याने मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा पवई येथील एस. एम. शेट्टी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत वेदांत जोशी (जोशी महाविद्यालय) याने सुवर्ण, विक्रम ठाकूर (ठाकूर महाविद्यालय) याने रौप्यपदक, तर कुमार मीत पाटील - माहीम आणि सूरज सिंग (रिझवी कॉलेज) याने कांस्यपदक पटकावले. गेल्या अनेक वर्षांपासून मार्शल आर्ट्सच्या क्षेत्रात मीत पाटील सक्रिय आहे. त्याने तिसऱ्या इयत्तेत असताना केरळमधील राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये त्याने पदके मिळवली. या यशामध्ये त्याचे प्रशिक्षक डॉ. राजू खान यांचे मोठे योगदान आहे. अभिनंदन मीत आणि भविष्यासाठी शुभेच्छा!!!
