वसई - दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी वसई ॲडवेंचर फाउंडेशन संस्थेचे तीन सायकलपटू श्री ज्युड डिसुझा. वसई , सचिन कवळी. आगाशी आणि प्रणव राऊत. विरार हे लाल चौक श्रीनगर येथून सायकल प्रवासाला निघाले . ३१ दिवस , ११ राज्ये आणि ३७१५ किमी प्रवास करून आज १० डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथे सागरातून उगवत्या सूर्याच्या साक्षीने ही ऐतेहासिक सायकल मोहीम यशस्वी केली . वसई ॲडवेंचर फाउंडेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला ! रस्ता सुरक्षा जागृतीचा संदेश घेऊन ही सायकल मोहीम कऱण्यात आली. तिन्ही साहसवीरांचे अभिनंदन . या मोहिमेला प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे आभार !!